बिग बॉस मराठी सीझन ४ चांगलाच गाजला तो अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीमुळे.

त्यांची या पर्वातील केमस्ट्री आता खऱ्या आयुष्यातही पाहायला मिळाली.

अमृता आणि प्रसादने १८ जुलैला गुपचूप साखरपुडा उरकला. त्यानंतर सर्वत्र त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली.

तर आता अमृता व प्रसाद यांच्या केळवणाला देखील सुरुवात झाली आहे.

यावेळी ते दोघेही एकदम पारंपारिक पद्धतीने तयार झाले होते.

अमृता व प्रसाद हे दोघे पहिल्या केळवणाला कुठे गेले हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

त्यामुळे या जोडीच्या नवनवीन गोष्टी जाणून घ्यायला प्रेक्षक फारच उत्सुक असतात.

येत्या १८ नोव्हेंबरला अमृता आणि प्रसाद लग्नबंधनात अडकणार आहेत.