हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर ही  मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी.

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक आणि अक्षया काही महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकले.

हार्दिक-अक्षयाने मंगळागौरचे सुंदर फोटो सोशल मिडियावरून शेअर केले आहेत.

यामध्ये अक्षया आणि हार्दिक एकत्र मंगळागौर खेळताना दिसत आहेत.

या समारंभासाठी अक्षयाने सोनेरी रंगाची बनारसी साडी, हातावर मेहेंदी, हातात सोनेरी रंगाच्या बांगड्या आणि श्रृंगार केला आहे.

जोशी आणि देवधर कुटुंबियांनी मिळून अक्षयाची पहिली मंगळागौर खूपच थाटामाटात साजरी केली.