आज ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या चाहत्यांना गोड बातमी दिली.

प्राजक्ता ही मराठी सिनेसृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री आहे.

सध्या ती महाराष्ट्राची हस्याजत्रा या कार्यक्रमातून चाहत्यांचे मनोरंजन करत असते.

‘प्राजक्तराज’च्या यशानंतर प्राजक्ताने ‘प्राजक्तकुंज’ची घोषणा केली.

प्राजक्ताने वयाच्या ३४व्या वर्षी कर्जत इथे स्वतःचं आलिशान फार्महाउस विकत घेतला आहे.

आज तिने तिच्या फार्महाउसची झलक चाहत्यांना दाखवली आहे.

फार्महाउस मध्ये मोठ स्विमिंगपूल असून येथे एकाच वेळी १५ हून अधिक लोकं राहू शकतात.

निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या फार्महाउसमध्ये ३ बेडरूम आणि एक मोठं किचन देखील आहे.