मराठी कुटुंबात जन्मलेल्या 'शरद केळकर'ची गणना आज लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये केली जाते.

अभिनयाआधी त्याने जिममध्ये नोकरी केली तसेच मॉडेलिंगसुद्धा केले आहे.

२००४ सालच्या 'आक्रोश' या मालिकेतून आणि त्याच वर्षी 'हलचल' या सिनेमातून शरदने सिनेसृष्टीत पदार्पण केले.

जगभरात गाजलेल्या बाहुबली सिनेमाच्या हिंदी व्हर्जनसाठी केलेल्या डबिंगमुळे त्याची लोकप्रियता आणखी वाढली.

अनेकदा शरदने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका देखील प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.

जवळपास १९ वर्षांपासून शरद कलाविश्वात कार्यरत आहे. आणि या काळात त्याने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.

आत्ताच प्रदर्शित झालेल्या 'लक्ष्मी' या सिनेमातील शरदची तृतीपंथीची भूमिका चांगलीच गाजली.

२००५ साली अभिनेत्री 'किर्ती गायकवाड'सोबत शरदने लग्नगाठ बांधली.

शरद आणि किर्तीला ९ वर्षांची मुलगी असून तिचे नाव केशा असे आहे.