प्रामुख्याने मराठी आणि हिंदीमध्ये काम करणारी अभिनेत्री अनुजा साठे हिचा आज वाढदिवस.

रंगभूमीवरून कामाला सुरुवात करून अनुजाने आज सिनेसृष्टीत प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.

२०१० साली ‘अग्निहोत्र’ या मालिकेतून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक लोकप्रिय मालिकेत काम केले आहे.

अग्निहोत्र, सुहासिनी, लगोरी मैत्री रिटर्न्स, विसावा – एक घर मनासारखं या तिच्या लोकप्रिय मालिका.

कॉफी आणि बरंच काही, राखणदार अशा अनेक सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

‘बाजीराव मस्तानी' या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले.

‘एक थी बेगम’ या वेबसिरीजमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली.

२०१३ साली मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता सौरभ गोखले याच्यासोबत लग्नबंधनात अडकली.

अनुजाचा कलावंत ढोल ताशा पथकात देखील अग्रणी सहभाग आहे.