‘दगळी चाळ’ फेम अभिनेत्री पुजा सावंतच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे.

पुजा सावंतने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती.

यामध्ये पुजा एका मुलाच्या मिठीत दिसत होती, सोबतच ‘We are engaged’ असं कॅप्शन लिहिलं होतं.

पूजाच्या या ‘MysteryMan’चं नाव सिद्धेश चव्हाण असून तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो.

पुजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांचा नुकताच साखरपुडा पार पडला.

या साखरपुड्यातील फोटो सोशल मिडीयावर आले असून चाहत्यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

या सोहळ्यात पुजाने हिरवी पैठणी साडी, नाकात नथ, भरजरी हार असा पारंपरिक लूक केला होता.

तर सिद्धेशने ऑफ व्हाईट रंगाचा सदरा परिधान केला होता.

पुजा आणि सिद्धेशला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा