दर महिन्याला वेगवेगळे विषय घेऊन अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. आता आणखी एक नवा कोरा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.

Off-white Banner

चित्रपटाच्या नावावरून तरी यात काहीतरी वेगळ असणार आहे, हे तर नक्की आहे. कारण चित्रपटचं नाव देखील अगदी हटके आहे.

Off-white Banner

काही दिवसांपूर्वीच पुण्यात ‘भिशी मित्रमंडळ’या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला.

Off-white Banner

या सिनेमात प्राजक्ता माळी दिसून येणार आहे. तसेच तिच्यासोबत अनेक कलाकार दिसणार आहेत.

Off-white Banner

तर आता आणखी एका कलाकाराचं नाव समोर आलं आहे. ती म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी ‘प्रिया बेर्डे’.

Off-white Banner

अमोल कागणे दिग्दर्शित हा सिनेमा २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली नाही.

Off-white Banner

प्राजक्ता नेहमीच वेगवेगळ्या भूमिका करताना दिसून येते. तर आता यात काय नवीन असणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

Off-white Banner

या चित्रपटाची घोषणा प्राजक्ताने तिच्या इंस्टाग्राम वरून केली होती. प्राजक्तावर  चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसून येतोय.