मराठी सिनेसृष्टीतील मराठमोळा आणि रांगडा गडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे  'हार्दिक जोशी.'

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून  तो प्रसिद्धीच्या झोतात आला.

या मालिकेमुळे हार्दिकला 'राणा दा' म्हणून रसिक प्रेक्षकांच्या मनात जागा मिळाली.

सुरुवातीला हार्दिक ढोल-ताशा पथकाचाही भाग होता.

राणा दा ही भूमिका साकारण्याआधी हार्दिकने क्राईम पेट्रोल, दुर्वा या मालिकांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत.

व्यायामाच्या बाबतीत हार्दिक खूपच कटाक्षपणे नियमांचे पालन करतो.

हार्दिक प्राणीमित्रांना देखील खूप जीव लावतो, मग त्याच्या घरचा कुत्रा असो वा मालिकेतील साहेबराव.

 मालिकेतील राणा दा आणि अंजली बाई ही जोडी  तर हिट ठरलीचं पण खऱ्याखुऱ्या आयुष्यातही  हार्दिक आणि अक्षया देवधर एकमेकांच्या प्रेमात रंगले.