अभिनेत्री रिंकू राजगुरु ‘सैराट’ या सिनेमातून नावारूपास आली.

‘आर्ची’च्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले.

रिंकू सोशल मीडियामार्फत कायम चाहत्यांच्या संपर्कात असते.

रिंकूने नुकतीच केदारनाथ मंदिराला भेट देत तिच्या भक्तीसारातील एक टप्पा पूर्ण केला आहे.

रिंकूने केदारनाथच्या यात्रेतील तिचे अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले.

या फोटोंमध्ये रिंकूने डोक्याला भस्म लावून, अंगावर शाल घेतली आहे.

अगदी साध्या वेशातील तिचा भक्तीभाव तिच्या नजरेत दिसत आहे.