सारेगमप लिटिल चॅम्प्समधील पंचरत्नांपैकी एक रत्न म्हणजे ‘कार्तिकी कल्याणजी गायकवाड.’

वारकरी संप्रदायात जन्मलेल्या कार्तिकीने आपल्या वडिलांकडूनच गायनाचे धडे गिरवायला सुरुवात केली.

लिटिल चॅम्पची विजेती ठरलेल्या कार्तिकीने या शोमधून अवघ्या नवव्या वर्षीच संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले.

२०१२ मध्ये कार्तिकीचा दीनांचा सोयरा पांडुरंग हा पहिला अल्बम तर २०१५ मध्ये स्वरानुभूती हा दुसरा अल्बम प्रकाशित झाला आहे.

कार्तिकीने गायलेली घागर घेऊन, खंडेरायाच्या लग्नाला, हरे कृष्णा, रेशमाच्या रेघांनी ही गाणी आजही मनात घर करून आहेत.

गायनासोबातच कार्तिकीने गजर किर्तनाचा, पालखी, दिंडी या  कार्यक्रमांचे निवेदनही केले आहे.

सुख म्हणजे नक्की काय असतं यांसारख्या अनेक मालिकांच्या शीर्षक गीतांमध्ये तिचे मोलाचे योगदान आहे.

आज कार्तिकी लोकप्रिय पार्श्वगायिका म्हणून नावारूपास आली आहे, त्यामुळे ती अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत असते.

९ डिसेंबर २०२० रोजी रोनित पिसे सोबत कार्तीकीने लग्नगाठ बांधली.