अभिनयाची आवड असणाऱ्या श्रुतीने मॉडेलिंगपासून तिच्या करिअरची सुरुवात केली.

२००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सनई चौघडे’ या गाजलेल्या मराठी सिनेमातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

मराठी, हिंदी भाषेतील अनेक मालिका आणि सिनेमातून तिने तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली.

श्रुती आजवर मराठी, हिंदी, तमिळ आणि कन्नड अशा विविध भाषेतील मालिका आणि सिनेमात झळकली आहे.

दाक्षिणात्य सिनेमांमध्येही श्रुतीने चांगलेच नाव लौकिक केले असून तिथे तिला  ‘श्रुती प्रकाश’ या नावाने ओळखले जाते.

‘राधा ही बावरी’ या मालिकेतील श्रुतीची राधा ही भूमिका अविस्मरणीय आहे.

२०१४च्या ‘तुझी माझी लव्हस्टोरी’ या सिनेमाच्या शूटिंगवेळी अभिनेता  ‘गौरव घाटनेकर’शी तिची ओळख झाली आणि तिथेच त्याचे प्रेम जुळले. दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर २०१६ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली.

नुकतीच प्रदर्शित झालेली  ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेतून श्रुतीने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे.

पुण्यातील कलावंत पथकातही श्रुतीचा सहभाग आहे, त्यामुळे समारंभाच्यावेळी तिचे हे कौशल्य, तिचे चाहते अभिमानाने पाहत असतात.