नाशिकमध्ये जन्मलेल्या अनिताने पुण्यात शिक्षण पूर्ण केले तर तिथेच अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली.

बालवीर, बंदिनी, भाई भैया और ब्रदर यांसारख्या हिंदी मालिकेतून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

कॉफी आणि बरंच काही, आजोबा, पोपट, एका लग्नाची तिसरी गोष्ट या सिनेमांत ती झळकली आहे.

अनिताच्या अग्निहोत्र, मंथन, अनामिका या मालिकाही चांगल्याच लोकप्रिय झाल्या.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून  ती प्रसिद्धीच्या झोतात आली, तर ती सध्या ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेत झळकत आहे.

सध्या अनिताच्या ‘किरकोळ नवरे’ या नाटकाला देखील प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

२००५ साली अनिताने  ‘चिन्मय केळकर’ सोबत लग्नगाठ बांधली.

अगदी सहजसुंदर अभिनयाने अनिताने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे.

अशा गोड अभिनेत्रीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.