अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने नुकतेच काही फोटो शेयर केले आहेत.

आज तिने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.

नुकत्याच झालेल्या झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात सोनालीला एक बहुमान मिळाला आहे.

सोनालीला "नॅचरल परफॉर्मर ऑफ दी यिअर" हा पुरस्कार मिळाला आहे.

संजय जाधव दिग्दर्शित आणि सोनालीची महत्वाची भूमिका असलेल्या 'तमाशा लाईव्ह' या चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे.

या पुरस्कार सोहळ्यासाठी सोनालीने अगदी हटके लुक केला होता.

या पुरस्कारासाठी अनेकांनी तिच्या पोस्टवर कमेंट करत तिचे कौतुक केले आहे.