अभिनायासोबतच सौंदर्याने कायम चाहत्यांना घायाळ करणारी बॉलिवूडमधील अभिनेत्री म्हणजे ‘जान्हवी कपूर’ (Janhvi Kapoor).

सध्या सर्वत्रच ‘व्हॅलेन्टाईन डे’चा माहोल आहे. त्यातच जान्हवीने केलेले सुंदर फोटोशूट चांगलेच चर्चेत आहे.

जान्हवीने नुकत्याच केलेल्या फोटोशूटमध्ये अनेक दिलखेचक पोजेस दिल्या आहेत, त्या पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

यावेळी जान्हवीने रेड डीपनेक गाऊन घातला होता, ज्यामुळे ती आणखीनच बोल्ड आणि ब्युटीफुल दिसत आहे.

बोल्ड ड्रेससह मोकळे सोडलेले केस आणि ओठांच्या लिपस्टिकने तिचं सौंदर्य आणखीनच खुलले आहे.

तिचा हा बोल्ड लूक पाहून सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला आहे.

जान्हवीच्या या पोस्टवरील तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत सर्वांनी तिचे कौतुक केले.