अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचा  जन्म २८ फेब्रुवारी, १९६८ साली  गोवा येथे झाला.

वर्षा यांनी नाटक, दूरचित्रवाणी, मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेत्री  म्हणून अनेक वर्षे काम केले.

वर्षा याचं पहिलं नाटक ‘कार्टी प्रेमात पडली’  हे असून त्यामध्ये वर्षा आणि लक्ष्मीकांत बेर्डे  यांनी एकत्र काम केलं.

‘गंमत जंमत’ या आपल्या पहिल्याच मराठी चित्रपटातून वर्षा यांना  प्रसिद्धी मिळाली.

अफलातून, आमच्या सारखे आम्हीच, एक होता विदूषक आणि सवत माझी लाडकी हे वर्षा यांचे चित्रपट विशेष गाजले.

दिलवाले कभीना हारे, दूध का कर्ज, हनीमून, हफ्ता बंद, तिरंगा आणि साथी यांसारख्या अनेक हिंदी भाषिक चित्रपटांमध्ये सुद्धा वर्षा यांनी आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली.

वर्षा यांना एक कन्नड चित्रपटाची  ऑफर आली, मात्र त्यामध्ये  ‘Swimming Two Piece’ परिधान करायचे होते म्हणून त्यांनी तो  चित्रपट नाकारला.

अभिनय क्षेत्रात काम करण्यासोबतच त्या सामाजिक क्षेत्रात देखील कार्यरत आहेत.

त्यांची ‘सांगाती’ नावाची एक संस्था आहे. ही संस्था आयुष्यभर कलेची सेवा करणाऱ्या कलावंतांना वृद्धापकाळात मायेचा हात देण्याचे कार्य करत असते.