बॉलिवूड अभिनेते 'नसीरुद्दीन शाह' आणि त्यांची पत्नी 'रत्ना पाठक' ही हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील हिट कपल.

नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक यांची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये पहिली भेट झाली. इथेच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.

दोघेही वेगवेगळ्या धर्माचे होते. नसीरुद्दीन यांचं आधीच लग्न झालं होतं.

७०च्या दशकात दोघांची पहिली भेट झाली होती. दोघांनी एकत्र अनेक सिनेमात काम केलं होतं. अनेक वर्ष ते लिव्ह इनमध्येही राहत होते.

दोघांनी १९८२ मध्ये लग्नगाठ बांधली.  'इमाद आणि विवान' अशी दोन मुलं त्यांना आहेत.

नसीरुद्दीन यांनी सांगितलं की, "रत्नाच्या इस्लाम धर्मांतराचा विषय माझ्या आईने केवळ एकदाच उपस्थित केला होता."

"धर्मांतराच्या प्रश्नावर रत्नाकडून नकारात्मक उत्तर मिळाल्यानंतर आईनेही संमती दर्शवली होती."