वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी ‘ ययाती आणि देवयानी ‘ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवलं.

1

अशोक मामांनी केवळ मराठीमध्येच नाही तर हिंदीमध्ये ही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

2

अशोक सराफ यांनी भोजपुरी चित्रपटात सुद्धा काम केलं आहे.

3

नायक, सहनायक तर कधी खलनायक अश्या अनेक भूमिका त्यांनी साकारल्या आहेत.

4

अशोक सराफ यांची 'अशी ही बनवाबनवी' मधील त्यांची धनंजय माने ही भूमिका आजही रसिकांच्या लक्षात आहे.

5

अशोक सराफ यांनी अभिनयासोबतच काही चित्रपटांमध्ये गाणीसुद्धा गायली आहेत.

6

आपल्या सर्वांचे लाडके मामा म्हणजेच अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

7

'हा पुरस्कार मिळणं हे खूप सुखद आहे, आणि माझा हा सत्कार हा माझ्यासाठी सर्वात मोठा सत्कार आहे', अशा भावना अशोक सराफ यांनी मांडल्या.

8