श्वेता तिवारी ही एक अभिनेत्री असून ती मुख्यतः हिंदी सिनेमे आणि मालिकांमध्ये झळकली आहे.

श्वेता ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून घराघरांत पोहचली. त्यासोबतच श्वेताने ‘परवरिश’, ‘बेगुसराय’, ‘मेरे डॅड की दुल्हन’ या मालिकेत काम केले आहे.

श्वेता ही हिंदी रिऍलिटी शो ‘बिग बॉस’च्या चौथ्या सीझनची आणि ‘कॉमेडी सर्कस का नया दौर’ची विजेती आहे.

श्वेता तिवारीने करियरची सुरुवात 1999 पासून केली असून तिची 'कालीरे' नावाची पहिली मालिका दूरदर्शनवर लागायची.

४३ वर्षाची श्वेता आपल्या फॅशन सेन्स, फिटनेस आणि ग्लॅमरसाठी ओळखली जाते. काय असेल तिच्या फिटनेस मागचे रहस्य तर...

श्वेता फिटनेस सांभाळण्यासाठी दिवसाला एकदाच साॅलिड मिल घेते.

साॅलिड मिलमध्ये १०० ग्रॅम चिकन किंवा मासे, २००-३०० ग्रॅम भाज्या, ज्वारीची एक रोटी खाते.

सकाळी नाश्त्यासाठी ९० ग्रॅम दही आणि ८ ते १० बदाम खाते.