एखाद्या अभिनेत्रीला आपलं घर, आपली मुलं, आपला नवरा, घरातील सगळी कामं सांभाळून मग मालिका किंवा सिनेमांसाठी शूटिंग करणे म्हणजे खूपच कठीण काम असतं. आणि हे सगळं करत असताना आपल्याला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या होणारा त्रास हे सहन करावं लागतं. आणि त्यासोबतच सगळ्यात मोठी जबादारी म्हणजे हे करत प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणे.
स्टार प्रवाह वहिनीवरील गेले अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’(Aai Kuthe Kaay Karte). २०१९ साली आलेल्या या मालिकेने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. या मालिकेतील अरुंधती हे पात्र साकारणारी अभिनेत्री म्हणजेच मधुराणी प्रभुलकर हिने अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा सिनेसृष्टीत काम करायला सुरुवात केली. आज मधुराणीला अरुंधती या पात्रामुळे प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे, मधुराणी एक अभिनेत्री तर आहेचं पण त्या सोबतच ती एक उत्तम गायिका देखील आहे. मधुराणी शास्त्रीय संगीताचे अनेक कार्यक्रम देखील करते. तसेच ती भारतासह बाहेर देशात देखील अनेक कार्यक्रम करते.
नुकतचं एका मुलाखती दरम्यान मधुराणीने तिचा आई कुठे काय करते मधील प्रवास, तिला त्यातून काय काय शिकायला मिळालं आणि अशा अनेक गोष्टी तिने शेअर केल्या. यावेळी तिला अरुंधतीच्या भूमिकेतून तुला कोणत्या नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या? असा प्रश्न विचारला. यावेळी मधुराणी म्हणाली, “मी सलग चार-सव्वा चार वर्ष रोज १३ तास काम करू शकेल, एवढी क्षमता माझ्यामध्ये आहे हा माझा मला शोध लागला. मी खूप अशी मुलगी आहे की, चोखंदळचं काम करेल आणि मी तशीच होते. कारण मालिका करायला भावनिक, मानसिक, शारीरिक ताकद लागते चित्रपट करताना तुम्हाला माहित असतं की, मला इथे तणमन सगळं अर्पण करायचं आहे. पण हे काही दिवसांनी संपणार आहे. मालिका सातत्याने सुरू आहे. तसंच तुमच्या आयुष्यातही सतत काहींना काहीतरी घडतं असतं.”
पुढे ती म्हणाली, “मी असं म्हणत नाही की, घरोघरी असंच सुरू असतं. पण अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्या देखील भावनांचा चढ-उतार होतं असतो. त्यात तुम्हाला रोज उठून त्याचं तन्मयतेने काम करायचं आहे. आपण एवढ्या जणांच्या, जणींच्या मनात घर करू शकतो. आपला अभिनय इतक्या जणांचं आयुष्य बदलू शकतो याचा नव्याने मला शोध लागला, असं मला वाटतं.”
मधुराणीचा तिच्या दैनंदिन आयुष्यातील हे पान देखील उलगडले, त्यातून कायमच अनेकांना प्रेरणा मिळत जाईल.