महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे. कॉमेडीची अचूक संधी साधत प्रेक्षकांना मनमुराद हसवणारा गौरवने आता एक हिंदी शो गाजवताना दिसतोय. घराघरांत गौरव मोरे फिल्टरपाड्याचा बच्चनम्हणून ओळखला जातो. विनोदाचं अचूक टायमिंग साधत गौरवने महाराष्ट्रातील सगळ्याच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि आता हिंदीत तो मंच गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून गौरवच्या या धमाकेदार कॉमेडीवर हिंदी प्रेक्षकही खळखळून हसत आहेत. आणि तो प्रेक्षकांचं नॉनस्टॉप मनोरंजन करत आहे. सध्या सोशल मीडिया वर गौरव आणि बॉलिवूड अभिनेत्री जूही चावला यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे आणि त्यामागचं कारणदेखील तितकेच खास आहे.
गौरवने काही दिवसांपूर्वीच ‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी कार्यक्रमात दणक्यात एन्ट्री घेऊन पहिल्याच भागात जबरदस्त परफॉर्मन्स दिला. गौरवचा तुफान परफॉर्मन्स जुही चावलाला इम्प्रेस करून गेला.
जुही चावला आणि बॉलिवूड किंग शाहरुख खान यांच्या आयकॉनिक ‘डर’ चित्रपटातील किंग खानचं पात्र गौरव रिक्रिएट करणार असून ” तू है मेरी किरण “हे गाणं गात गौरव शाहरुखची हुबेहूब नक्कल करत आहे असा प्रोमो सध्या व्हायरल होत आहे. गौरवने जुहीला गुडघ्यावर बसून गुलाब देतो. गुलाबाच्या पाकळ्यांची तिच्यावर उधळण करतो हा सगळा किस्सा लवकरच बघायला मिळणार असून यावर जुही काय बरं रिॲक्ट होणार हे बघण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
सगळ्या बद्दल गौरव म्हणाला की ” मॅडनेस मचाएंगे ” सुरू होऊन अगदीच काही दिवस झाले आहेत आणि हिंदीत एवढा कमालीचा शो करायला मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मराठीच्या सोबतीने हिंदी प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम ही माझ्या कामाची पोचपावती आहे. आणि अजून उत्तम काम करण्याची एक प्रेरणा देखील आहे. या शोमध्ये अजून धमाल, मज्जा, मस्ती करायची आहे. पण जूही चावला मॅमसोबत मला स्टेज शेयर करायला मिळणं हे एक सुख आहे ”
हिंदीमध्ये देखील आपली छाप पाडणाऱ्या गौरव मोरेचा हा नवीन शो तुम्ही पाहिलात का?