मराठी सिनेसृष्टीतील स्टाईल आयकॉन, दिग्दर्शक, निर्माता आणि उत्कृष्ट अभिनेता अंकुश चौधरी याने आपल्या अष्टपैलू कलाकृतीने साऱ्यांना कायमच भूरळ घातली.

ऑल द बेस्ट या नाटकातून रंगभूमीवरील कारकीर्द सुरू झाल्यावर करून गेलो गाव, आमच्या सारखे आम्हीच, गोपाळा रे, तू तू मी मी यांसारख्या अनेक नाटकांतून अंकुशने रंगभूमी गाजवली.

महाराष्ट्राची लोकधारा, एकापेक्षा एक या शोज् मधून तर बेधुंद मनाची लहर, आभाळमाया,  'हसा चकट फु' यांसारख्या मालिकांमधून अंकुशने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.

‘सुना येती घरा’ या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केल्यावर यंदा कर्तव्य आहे, चेकमेट, माझा नवरा तुझी बायको, डबल सीट, ती सध्या काय करते, दगडी चाळ,, दुनियादारी, गुरू यांसारख्या अनेक सिनेमांमधून अंकुशने सिनेसृष्टीत अधिराज्य गाजवले.

'ऑल द बेस्ट' या नाटकात अभिनेत्री दिपा परब ही देखील अभिनय करायची. या नाटकाच्या रंगीत तालमीने अंकुश व दिपाच्या आयुष्यात प्रेमाचे रंग भरले.

हिंदीतील सुप्रसिद्ध चित्रपट  'जिस देश मैं गंगा रहता है' यात अंकुशने एक छोटी भूमिका साकारली होती

सावरखेड एक गाव, आई शप्पथ, मातीच्या चुली, यंदा कर्तव्य आहे, संशय कल्लोळ, चेक मेट, गैर, ब्लफमास्टर अंकुशचे हे चित्रपट प्रेक्षकांना भुरळ घालून गेले.