मराठी सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहत आहे. एकामागून एक अनेक कलाकार लग्नगाठ बांधून चाहत्यांना सुखद धक्का देत आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून सिद्धार्थ व तितीक्षाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते.

थेट केळवणाचे फोटो शेअर करत दोघांनी प्रेमात असल्याची कबुली देत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे संकेत दिले

सिद्धार्थने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक स्टोरी पोस्ट करत याबाबतचे अपडेट दिले आहेत.

जात्यावर हळदकुंड बांधलेला एक फोटो त्याने शेअर करत लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचं समोर आलं आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील इशा डे व अभिनेत्री आकांक्षा गाडे या दोघींनी मिळून तितीक्षा व सिद्धार्थच्या केळवणाचा कार्यक्रम पार पाडला

सिद्धार्थ व तितीक्षा यांच्या शुभविवाह ठाणे येथे पार पडणार असल्याची चर्चा आहे.

‘असे हे कन्यादान’, ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकांमध्ये तितीक्षा व सिद्धार्थ यांनी एकत्र काम केलं आहे.