देवयानी या मालिकेतून आणि बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातून अभिनेत्री शिवानी सुर्वे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचली.

नुकताच प्रदर्शित झालेला झिम्मा २ या सिनेमामुळे शिवानी मागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे.

पण ती सध्या कामामुळे नाही तर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

शिवानीने अजिंक्य सोबतचे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला.

शिवानीचा बॉयफ्रेंड म्हणजेच अभिनेता अजिंक्य ननावरे यांची पहिली भेट ही ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेच्या सेटवरून झाली.

शिवानी आणि अजिंक्य  हे दोघे २०१७ पासून एकमेकांना डेट करत होते.

३१ जानेवारीला शिवानी आणि अजिंक्य यांनी गुपचूप साखरपुडा उरकून त्यांच्या लग्नाची घोषणा केली.

अन् १ फेब्रुवारीला शिवानी आणि अजिंक्य या दोघांनी लग्नगाठ बांधली.

साखरपुडा आणि लग्नाच्या दोन्ही समारंभाला दोघांनी एकमेकांना साजेशे कपडे परिधान केले होते, त्यात ते खूपच सुंदर दिसत होते.