मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपली छाप उमटवणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर दीदी याचं वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले.
गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत बिघाडली होती. दादर येथील सुश्रुषा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. सुलोचना दीदींच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकरांनी शोक व्यक्त केला .
मराठी मातीतील शालीनता, घरंदाज अभिनय आणि सोज्वळतेचा चेहरा म्हणजे सुलोचना दीदी अशी त्यांची ओळख होती. सुलोचना दीदीचं मूळ नाव सुलोचना लाटकर. कोल्हापूरमधल्या खडकलाट गावी सुलोचना दीदींचा जन्म झाला. 250 हून अधिक मराठी आणि 150 हून अधिक हिंदी सिनेमांमध्ये दीदींनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. तंबुतल्या चित्रपटाने सुलोचना दीदींमध्ये अभिनयाची ओढ निर्माण केली. पण त्यांचं खरं शिक्षण झालं ते गुरु भालजी पेंढारकरांच्या मार्गदर्शनाखाली.
दिदींनी आतापर्यंत अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मराठा तितुका मेळवावा, मोलकरीण, बाळा जो जो रे, सांगते ऐका, सासुरवास, वहिनीच्या बांगड्या अशा अनेक मराठी, तर दिन बहार के, कटी पतंग, नाटक, चिराग, संबंध अशा हिंदी सिनेमांमध्ये काम केले.
यापूर्वी मार्चमध्ये जेव्हा सुलोचनादीदी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुलोचनादीदींवरील उपचारांचा सर्व खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
© 2020 fillamwala
© 2020 fillamwala