रितेश व जिनिलिया यांच्या ‘वेड‘ या सिनेमानं सध्या अख्ख्या महाराष्ट्राला खरचं वेड लावलं आहे.
रितेश देशमुखने दिग्दर्शित केलेला हा त्याचा पहिलाच सिनेमा अन् जिनिलिया या सिनेमाची निर्माती आहे. शिवाय हा तिचा पहिला वहिला मराठमोळा सिनेमा. हा चित्रपट ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि अवघ्या ३ ते ४ दिवसांत या चित्रपटाने दमदार कमाईही केली आहे.
जिनिलियाने वेड या सिनेमामध्ये ‘श्रावणी’ ही भुमिका खूप सुंदर पणे साकारली आहे. तर थिएटरमध्ये श्रावणीच्या एंट्रीला होणारा टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्यांचा आवाज असा एकंदर खूपच उत्तम प्रतिसाद प्रेक्षक देत आहेत.
View this post on Instagram
प्रेक्षकांनी तिला आणि तिच्या सिनेमाला दिलेल्या प्रचंड प्रतिसादानंतर जिनिलियाने एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहेत. वेड चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाचा एक व्हिडीओ तिने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने लिहिले की, “रिक्षातून भर पावसात तिचा उजवा पाय बाहेर पडतो. ती छत्री उघडते आणि पहिल्यांदा पडद्यावर दिसते. ‘श्रावणी’चं टाळ्या, शिट्ट्यांनी तुम्ही स्वागत केलं. पण ते माझं ही मराठी चित्रपट जगातलं पहिलं पाऊल होतं. तुम्ही श्रावणीला दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.” तिचा हा व्हिडीओ आणि तिचा नम्रपणा नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत अनेकजण हा चित्रपट आवडल्याचं सांगत आहेत.
अनेकांनी तिच्या कामाचं कौतुकही कमेंट्स करत केलं, तर अनेकांनी “यापुढेही तुला मराठी चित्रपटांमध्ये बघायला आवडेल,” अशा कमेंट्स केल्या आहेत.
View this post on Instagram
‘वेड’ या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाच्या टीझरला, सगळ्या गाण्यांना आणि ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यामुळे चित्रपटगृहातही हा सिनेमा चांगलीच कामगिरी करणार असा सगळ्यांना विश्वास होता.
तसेच या सिनेमामध्ये रितेश-जिनिलियाबरोबरच अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर यांच्याही विशेष भूमिका आहेत. तर अभिनेता ‘सलमान खान’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला आहे. अशाप्रकारे महाराष्ट्राला ‘वेड’ लावण्यात रितेश-जिनिलीया यांना यश मिळाले आहे.