बिग बॉस’मुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आणि गायिका ‘शहनाज गिल’चा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. शहनाज तिच्या सहज आणि विनम्र स्वभावासाठी ओळखली जाते. बिग बॉसच्या घरात असताना तिचं नाव अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबत जोडलं गेलं होतं. पण सिद्धार्थच्या निधनानंतर ती पूर्णपणे खचली होती. आता पुन्हा एकदा शहनाज इंडस्ट्रीत सक्रिय झाली आहे.
नुकतीच शहनाज गिल एका कार्यक्रमात पोहोचली होती. तिथे तिला गाणं गाण्यास सांगण्यात आलं. गाताना शहनाजला अजानचा आवाज आला आणि ती थांबली शहनाजच्या या कृतीचं नेटकऱ्यांकडून खूप कौतुक झालं.
गायिका सोना मोहापात्राने शहनाज गिलवर निशाणा साधला आहे. सोना मोहपात्रा तिच्या स्पष्ट बोलण्यासाठी ओळखली जाते. मुद्दा कोणताही असो, ती तिची प्रतिक्रिया देते. ती कधी कोणावर खुश होते तर कोणावर कधी दुःखी होते हे सांगणं कठीण आहे.
सोना मोहपात्राला तो दिवस आठवला, जेव्हा शहनाजने बिग बॉस १६ मध्ये भाग घेतलेल्या साजिद खानला पाठिंबा दिला. “लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला नॅशनल टीव्हीवर दाखवलं गेलं. तिने तिच्या बहिणींचा थोडा आदर केला असता तर बरं झालं असतं”, असं सोना मोहपात्राने लिहिलं. मात्र या ट्विटनंतर तिलाच ट्रोलिंगचा सामना करावा लागला. जेव्हा अनेकांनी साजिद खानला सपोर्ट केला तेव्हा सोना फक्त शहनाजलाच का टार्गेट करत आहे, असे विचारले.
सोना आपल्या पुढच्या ट्विटमध्ये म्हणाली की, “प्रिय ट्रोल जॅकलिनसारख्या दुसर्या अभिनेत्रीसाठी उभं राहण्याचा मी प्रयत्न करत आहे. मला माहीत नाही की शहनाजचं खास टॅलेंट काय आहे? सध्या तर फक्त ती टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये आहे. मला अशा महिला माहीत आहेत, ज्या शॉर्टकटद्वारे चांगले पैसे कमवतात.”
सोना मोहपात्राच्या या दुसऱ्या ट्विटनंतरही तिच्यावर जोरदार टीका झाली. शहनाजच्या नावाने स्वत:कडे प्रसिद्धी खेचणं सोनाने सोडलं पाहिजे, असं नेटकऱ्यांनी सोनाला सुनावलं. परंतू याप्रकरणी अद्याप शहनाजची कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही.