सध्याचा आघाडीचा अभिनेता रणबीर कपूर हा त्याच्या आगामी सिनेमासाठी चांगलाच चर्चेत आहे. ब्रम्हास्त्रच्या भरघोस यशानंतर तो आता आणखी एका नव्या सिनेमामध्ये दिसणार आहे.
रणबीरचा ‘तू झूठी मै मक्कार’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा हा सिनेमा ८ मार्च रोजी प्रदर्शित होणार होणार असून, रणबीर सध्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. लव्ह रंजन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे.
लव्ह रंजन यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये क्रिकेप्रेमींसाठी एक सुखद धक्का दिला होता. त्यांनी क्रिकेट विश्वातील दादा सौरव गांगुली यांच्यावरील बेयोपिकची घोषणा केली होती. परंतू अजूनही त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
View this post on Instagram
त्यातच रणबीरने तो एका बायोपिकवर काम करत असल्याचा खुलासा केला आहे. तू झूठी मै मक्कार या सिनेमाच्या प्रमोशनसाठी रणबीर नुकताच कोलकत्ता येथे पोहोचला होता. यादरम्यान त्याने ईडन गार्डन्स येथे सौरव गांगुली यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत क्रिकेटचा आनंद लुटला. यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना त्याला विचारण्यात आले की, “तू सौरव गांगुली यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे का?”
तर यावर रणबीरने उत्तर दिले की, “दादा (सौरव गांगुली) भारतातच नाही तर जगातले दिग्गज व्यक्ती आहेत. त्यांच्यावरील बायोपिक ही नक्कीच खास असेल. खरं तर मला या सिनेमा ऑफर आलेली नाही. मला वाटतं लव्ह रंजन फिल्ममेकर्स अजुनही स्क्रीप्टवर काम करत आहेत.”
तसेच रणबीरने तो करत असलेल्या बायोपिकचा खुलासा करत पुढे म्हणाला की, “मी ११ वर्षांपासून किशोर कुमार यांच्यावरील बायोपिकवर काम करत आहे. अनुराग बसु यांच्यासोबत आम्ही लेखन करत आहोत. मला आशा आहे ही माझी आगामी बायोपिक असेल. मात्र दादा वर बायोपिक बनत आहे याबाबतीत मी अजून काही ऐकले नाही त्यामुळे मला काहीच माहित नाही.”
त्यामुळे आता रणबीर किशोर कुमार यांच्या भूमिकेत कसा दिसणार आणि सौरव गांगुली यांच्या बायोपिकमध्ये त्यांची भूमिका कोण साकारणार हे जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.