अभिनेत्री प्राजक्ता माळी सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. ती सोशल मिडियावर देखील नेहमी सक्रीय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिने तिच्या उत्तम अभिनयाने आतापर्यंत सगळ्यांची मने जिंकली आहेत. तिचा चाहतावर्ग देखील मोठा प्रचंड मोठा आहे. मागील काही दिवसांपासून अभिनेत्री प्राजक्ता तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे, आता तिच्या नवीन पोस्टमुळे तिच्या लग्नाच्या चर्चांना उधान आलं आहे.
या पोस्ट मध्ये तिने तिचं पहिलं प्रेम कोणावर होतं आणि आजही कोणावर करते याबद्दल सांगितलं आहे. तिच्या या पोस्टने सगळ्याचं लक्ष वेधून घेतले आहे. आज २७ फेब्रुवारी म्हणजेच ‘मराठी भाषा गौरव दिन’ हा दिवस सगळीकडे मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. अशातच प्राजक्ताने तिच्या ‘प्राजक्तराज’ मधील ‘सोनसळा’ हे दागिने परिधान करून काही फोटो शेअर केले आहेत.
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देत तिने लिहिले की, “प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं… प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं…. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं… मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं… कवीश्रेष्ठ कुसूमाग्रजांनी लिहिलेल्या ह्या ओळींसारखंच प्रेम आहे माझं, माझ्या ‘मराठीवर’. जे आहे आज, राहील उद्या, परवा,मरणोत्तरही. ‘मराठी भाषा गौरव दिनाच्या’ महाराष्ट्राला आभाळभर शुभेच्छा.” या पोस्टमध्ये तिने तिच्या मराठीच्या प्रेमाबद्दल लिहिलं आहे. आपलं कायमच मराठीवर प्रेम राहील असं तिने लिहिलं आहे.
प्राजक्ताच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत, अनेकांनी तिचं कौतुक देखील केले आहे. तिच्या फोटोवर अनेकांनी कमेंट्स देखील केल्या आहेत. एकाने तर लिहिलं की ‘अस्सल मराठी सौंदर्य’. तर दुसऱ्याने ‘मराठी आणखी मोठी केली पाहिजे.’
त्यामुळे या मराठमोळ्या अभिनेत्रीची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.