सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा रंगली आहे ती ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमाची. सिनेमाच्या घोषणेपासूनच हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. कारण हा सिनेमा शुक्रवारी, २८ एप्रिल २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित असून या सिनेमात शाहीर साबळे यांची प्रमुख भूमिका अभिनेता अंकुश चौधरी याने साकारली आहे. तर शाहीर साबळे यांच्या पत्नीची म्हणजेच भानुमती यांची भूमिका केदार शिंदे यांची मुलगी सना शिंदे हिने साकारली आहे.
सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून या सिनेमाचे आणि कलाकारांचे प्रचंड कौतुक सूरू आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे हे नक्की. त्यामुळे अनेक प्रेक्षक सोशल मीडियावर सिनेमाबद्दल भरभरून लिहताना दिसत आहे. तर नेहमीप्रमाणेच या सिनेमातील कलाकार देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत.
View this post on Instagram
सना शिंदे हिने नुकताच एक खास फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या पणजीसोबत बोलताना दिसत आहे. त्यावेळी अंकुश चौधरी आणि केदार शिंदे देखील तेथे उपस्थित आहेत. तर अंकुश त्या दोघींचे हे क्षण कॅमेऱ्यात कैद करताना दिसत आहे.
हा सुंदर फोटो शेअर करत सनाने लिहिले की, “काल माझी पणजी म्हणजेच माझ्या ‘माई’ ने महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट पाहिला. मी तिची प्रतिक्रिया जाणून घेण्यास फार उत्सुक होते. हा पूर्णपणे माझ्या नकळत काढलेला फोटो आहे. यावेळी माझ्या चेहऱ्यावर असलेला आनंद आणि अंकुश चौधरी कायमस्वरुपी हा क्षण लक्षात राहावा म्हणून काढत असलेला फोटो.”
हे देखील वाचा : टीडीएम देणार का महाराष्ट्र शाहीरला टक्कर?
तसेच ती पुढे म्हणाली की, “तिने मला भानुमतीशी असलेल्या तिच्या नात्याबद्दलच्या गोष्टी सांगितल्या. हा माझा पहिला चित्रपट आणि तिचा प्रतिसाद हा खूप महत्त्वाचा होता. असच अजून शिकत राहीन, प्रामाणिकपणे काम करत राहीन.॥ श्री स्वामी समर्थ ॥”
महाराष्ट्र शाहीर या सिनेमात अंकुश चौधरी आणि सना शिंदे यांच्या व्यतिरिक्त अभिनेत्री अश्विनी महांगडे, निर्मिती सावंत असे कलाकार मंडळी या सिनेमात झळकले आहेत.