बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आयुष्यमान खुराना याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कारण आयुष्यमानचे वडील पंडीत पी. खुराना यांचे निधन झाले आहे.
आज शुक्रवार दि. १९ मे रोजी चंदीगढ येथे त्यांची प्राणज्योत मालवली. पंडीत खुराना हे मागील काही दिवसांपासूनच हृदयविकाराच्या आजाराने ग्रासलेले होते. जेव्हा त्यांची तब्येत खालावली तेव्हा त्यांना चंदीगढ मधील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार सुरू होते. परंतू उपचारादरम्यान सकाळी १०.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आयुष्यमान खुराना याचे वडील पंडीत पी. खुराना हे सुप्रसिद्ध ज्योतिषतज्ञ होते. एवढेच नाही तर त्यांनी ज्योतिष शास्त्राविषयी खोलवर अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांनी या संबंधीत अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या या क्षेत्रातील प्रसिद्धीमुळे त्यांना या क्षेत्रात सन्मानाचे स्थान होते. त्यामुळे लोकही त्यांना खूप आदर देत असत.
हे देखील वाचा : यामुळे अशोक सराफ यांना ‘मामा’ म्हणून मिळाली ओळख
आयुष्यमान आणि त्याच्या वडिलांचे नाते खूप घट्ट होते. पंडीत खुराना यांना आयुष्यमान व्यतिरिक्त आणखी एक मुलगा आहे. तो म्हणजे बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुराना. अपारशक्ती यांच्या प्रवक्त्याने पंडीत खुराना यांच्या निधनाची बातमी खरी असल्याचे सांगत लिहिले की, “आम्ही अत्यंत दुःखाने सांगू इच्छितो कि, आयुष्मान आणि अपारशक्ती खुराना यांचे वडील, ज्योतिषी पी खुराना यांचे आज सकाळी १०.३० वाजता मोहाली येथे असाध्य आजारामुळे निधन झाले. या काळात तुमच्या सर्व प्रार्थना आणि पाठींब्यासाठी आम्ही आभारी आहोत.”
अपारशक्ती आणि आयुष्यमान अनेकदा सोशल मीडियावर त्यांच्या वडिलांसोबतचे फोटोज् ही शेअर केले आहेत. परंतू त्यांच्या निधनाने खुराना कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सध्या सिनेसृष्टीतून आणि त्यांच्या नातेवाईकांकडून शोक व्यक्त करीत आहेत.