अभिनेत्री माधुरी पवार ही एका सामान्य कुटुंबामधली मुलगी असून ती साताऱ्याला राहणारी आहे. माधुरीच बालपण हे एका पत्र्याच्या घरात गेलं तिचे वडील गोवंडी काम करायचे त्यामुळे त्यांना काम असेल तिकडे फिरावं लागत असे माधुरीला शिकता याव म्हणून त्यांनी तिला तिच्या आजी जवळ ठेवलं होत. माधुरीला लहान पासूनच अभिनयाची व नृत्याची खूप आवड होती त्यामुळे तिने शिक्षणासोबत तिची आवड जोपासून त्यामध्ये करिअर देखील केलं. माधुरी पवार मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करून तिच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडते. तिने तिच्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे.
माधुरीने एका मुलाखतीमध्ये तिला लग्नाला मुलगा कसा हवा याबद्दल काही गोष्टींचा खुलासा केला आहे. माधुरी म्हणाली, “मी लग्न करेन की नाही, हाच मोठा प्रश्न आहे. मला आता तरी लग्न करावं असं वाटत नाही. कारण करिअर आणि इतर जबाबदाऱ्या खूप आहेत. या सगळ्यात मला एक जोडीदार मिळाला तर त्याला उत्तम मराठी यायला हवं. कारण माझं मराठीवर खूप प्रेम आहे. त्याला महाराष्ट्राचा इतिहास माहीत असावा. छत्रपती शिवाजी महाराजांची कारकिर्द त्याला माहीत असावी. तो स्त्रीचा, तिच्या मतांचा आदर करणारा असावा. तो त्याच्या आई-वडिलांचा आदर करणारा असावा. जर तो त्याच्या पालकांचा आदर करत असेल तरच तो माझ्या आई-वडिलांचा आदर करू शकेल.”
पुढे माधुरी म्हणाली, “तो खूप श्रीमंत असावा, प्रचंड पैसा कमावणारा असावा असं नाही. माझाही साड्या आणि चपला शिवाय फार खर्च नाही. त्यामुळे जेमतेम कमावणारा असेल तरीही चालेल. दिसायला तो खूप सुंदर असावा असंही नाही. मला सावळी मुलं खूप आवडतात. मीही सावळीच आहे, त्यामुळे सावळी, गव्हाळ रंगाची मुलं छान वाटतात. कारण त्यांचा स्मार्टनेस खूप अफलातून असतो. मुलाचे केस चांगले असावे, माझ्यापेक्षा थोडा उंच असावा आणि आयुष्यभर माझं ऐकणारा असावा.”
तिने तिच्या स्वभावाबद्दल देखील काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. माधुरी म्हणते की, “मी टॉम बॉयसारखी पण आहे, थोडी बालिशही आहे, गंभीरही आहे, परखड मतं मांडणारी आहे. मी स्वतःचाच विचार करते तेव्हा मला वाटतं की मला सांभाळणं खूप कठीण आहे. माझ्याशी लग्न करणं ही मोठी रिस्क आहे. अर्थात लग्न केल्यानंतर तो माझ्याबरोबर खूशही असेल,”