फक्त ९९ रुपयांत सिनेप्रेमींना मिळणार, मनोरंजनाचा डबल डोस…
मराठी, हिंदी वा इतर कोणतीही भाषा असुदेत, सिनेमाचे वेड प्रत्येकालाच असते. त्यासाठी रसिक प्रेक्षक वेगवेगळ्या माध्यामातून त्यांची सिनेमाची आवड पूर्ण करत असतात. असे असले तरी थिएटरमध्ये सिनेमा पाहण्याची मजा काही औरच.
भारतात १३ ऑक्टोबर हा दिवस ‘राष्ट्रीय सिनेमा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. शुक्रवार, दिनांक १३ ऑक्टोबर रोजी देशभरात मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा होणार आहे. राष्ट्रीय सिनेमा दिवसाचे औचित्य साधून संपूर्ण देशातील थिएटरमध्ये तिकिटाचे शुल्क फारच कमी ठेऊन, रसिक प्रेक्षकांसोबत हा दिवस साजरा केला जातो.
National Cinema Day is back on October 13th. Join us at over 4000+ screens across India for an incredible cinematic experience, with movie tickets priced at just Rs. 99. It’s the perfect day to enjoy your favorite films with friends and family. #NationalCinemaDay2023 #13October pic.twitter.com/Pe02t9F8rg
— Multiplex Association Of India (@MAofIndia) September 21, 2023
या दिवशी प्रेक्षकांना केवळ ९९ रुपयांमध्ये कोणताही सिनेमा पाहता येणार आहे. तर या तिकिटांचे आॅनलाइन किंवा आॅफलाइन अशा दोन्ही पद्धतीने बुकिंग करणे शक्य आहे. यावेळी तुम्हाला तुमच्या आवडीच्या कोणत्याही सिनेमाचा आनंद केवळ ९९ रुपयांत घेण्याची संधी आहे. तसेच सध्या भारतात प्रसिद्धीच्या झोतात असलेले काही सिनेमे राष्ट्रीय सिनेमा दिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
जवान, मिशन राणीगंज, फुकरे ३ यांसारख्या अनेक लोकप्रिय सिनेमे १३ तारखेला पाहता येणार आहेत. सिनेमा म्हणजे फक्त मनोरंजनच नाही तर भारतीय कलेचा, संस्कृतीचा आणि संस्कारांचा वारसा आहे. त्यामुळे अशा सिनेमांची मेजवानी कोण नाकारेल? याचेच उत्तम उदाहरण म्हणजे गेल्या वर्षीही या दिवशी एका दिवसात बॉक्स ऑफिसवर तब्बल ७५ कोटींची कमाई केली होती. त्यामुळे यंदा हा आकडा किती वाढणार याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. परंतू दुसरीकडे रसिक प्रेक्षक सध्या तिकीट खरेदी करण्याच्या तयारीत आहेत.
त्यामुळे आज महागाईच्या भडक्यात इतक्या स्वस्तात तेही थिएटरमध्ये सिनेमा पाहण्याचा आनंद नक्की लुटा.