सध्या भारतीय सिनेसृष्टीत ऐतिहासिक आणि देव-देवतांवर आधारित सिनेमांची जणू लाटच आली आहे. बॉलिवूडमध्ये देखील अशा विषयांवरील सिनेमांची क्रेझ चांगलीच वाढली आहे. बॉलिवूडमध्ये तर एकामागोमाग एक सिनेमांची सरबत्तीचं सुरु आहे. त्यात देवांवर आधारित देखील अनेक सिनेमे आहे. तर याह विषयावरील सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला सिनेमा म्हणेज ‘रामायण’(Ramayan).
लोकप्रिय दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्याकडे य आगामी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सोपवली आहे. रामायण या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्ष्क्वर्गात या सिनेमासाठी चांगलीच उत्सुकता आहे. त्यामुळे या सिनेमाचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीप्रमाणे उत्सुक आहेत. तर आता २ एप्रिलपासून रामायण सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे सिनेमाचे चाहते आणि या सिनेमातील कलाकारांचे चाहते प्रचंड खुश आहेत.
रामायण या आगामी सिनेमात अभिनेता रणबीर कपूर हा प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणार असून लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवी ही सीता माईची भूमिका साकारणार आहे. तसेच या सिनेमात सनी देओल हनुमानाची, बॉबी देओल कुंभकर्णाची, यश रावणाची तर विजय सेतुपती हा विभीषणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर साई पल्लवीसोबत अभिनेत्री रकुल प्रीत सिंह शूपर्णखा या भूमिकेत पाहायला मिळणर आहे. नुकतचं या सिनेमाचं शूटिंग सुरु झालं आहे. पण शूटिंग सुरु होताच काही दिवसांच्या आतच रामायण सिनेमाच्या सेटवरील काही फोटो लीक झाले. सेटवरील फोटो लीक झाल्यावर दिग्दर्शक खूपच नाराज होते. त्यामुळे त्यांनी सेटवरील कलाकारांसहित सर्वांनाच नो फोन पॉलिसी लागू केली.
एवढं करूनही पुन्हा एकदा रामायण सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा फोटो आता पुन्हा लीक झाला आहे. गेल्यावेळी सेटवरील फोटो लीक झाला होता तर आता थेट रणबीर आणि साई पल्लवीचा भूमिकेतील फोटो लीक झाला आहे. यावेळी ते दोघेही त्यांच्या भूमिकेत म्हणजेच श्रीराम आणि सीता माईच्या भूमिकेत आहे. फोटो लीक होताच सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. पण हे व्हायरल झालेले फोटो ‘झूम टीव्ही’ला अधिकृतरीत्या प्राप्त झाले आहेत. यावेळी व्हायरल झालेल्या फोटोमध्ये रणबीरने पारंपरिक कपडे परिधान केले होते. तर साईने सीता माईची वेशभूषा आणि केशभूषा केली आहे.