नुकताच १ मे रोजी महाराष्ट्र दिन पार पडला. महाराष्ट्र हा शब्द जरी ध्यानी आला तरी या मुलखाचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची आपसूक आठवण येते. मनोरंजन विश्वातही त्यांच्या पराक्रमावर आधारित नवनवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर आत्तापर्यंत प्रदर्शित झालेल्या सिनेमांपैकी हार्दिक जोशी आणि सुबोध भावे यांचा लोकप्रिय सिनेमा म्हणजे ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev).
बहुचर्चित हर हर महादेव हा सिनेमा २०२२ मधील दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. या सिनेमात लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर सुबोधसह अनेक तगडे कलाकार देखील या सिनेमात झळकले आहेत. तसेच यात आपल्या सर्वांचा लाडका राणा दा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी देखील ऐतिहासिक पात्र साकारताना आपण पाहिले. या सिनेमात हार्दिकने आबाजी विश्वनाथ यांचे पात्र साकारत आपल्या समोर मांडले.
आबाजी विश्वनाथ म्हणजे स्वराज्याच्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांना अखेरपर्यंत साथ देणारे चतुर, धाडसी, निष्ठावान साथीदार. राणा दा या पात्रानंतर हार्दिकच्या या भूमिकेनेही साऱ्यांचेच लक्ष वेधले होते. तर काल (१ मे २०२४ रोजी) महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिकने या सिनेमातील शूटिंग दरम्यानचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये हार्दिक म्हणजेच आबाजी विश्वनाथ हे सुबोध भावे साकारत असलेले छत्रपती शिवाजी महाराज या दोघांच्या गळाभेटीचा हा फोटो आहे. हा सुंदर फोटो पोस्ट करत हार्दिक जोशीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “प्रत्येक मराठी माणसाचं स्वप्न असणारा हा क्षण हर हर महादेव चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मला अनुभवता आला…. मुजरा राजं…कायम आशिर्वाद राहुदे… जय महाराष्ट्र.”
View this post on Instagram
हार्दिकची ही पोस्ट पासून सर्वांनाच हर हर महादेव या सिनेमाची आठवण झाली. अनेकांनी कमेंट करत “जय शिवराय”, “हर हर महादेव” असे लिहिले. गेल्या महिन्यातच हार्दिकचा लॉक डाऊन लग्न हा सिनेमा प्रदर्शित झाला. तर आता सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत शुभंकर ही भूमिका साकारत आहे.