रश्मिका मंदाना म्हणजेच बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री. ती कायमच तिच्या कामाने प्रेक्षकांची मने जिंकून घेत आली आहे. ‘पुष्पा’ मधील तिची श्रीवल्ली ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली.
रश्मिकाचे जगभरात लाखो चाहते आहेत. तर या श्रीवल्लीने आता पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहे. तेही बॉलिवूड किंवा टॉलीवूडच्या मंचावरून नाही तर मराठी मंचावरून आणि तो मंच म्हणजे ‘झी गौरव पुरस्कार सोहळा‘. सध्या झी गौरव पुरस्कार सोहळ्याची सर्वचजण वाट पाहत आहेत.
View this post on Instagram
हा मनाचा पुरस्कार कोणाला मिळणार याची वाट फक्त कलाकारच नाही तर प्रेक्षकही पाहत असतात. मात्र यंदाच्या पुरस्कार सोहळ्याचे आणखी एक खास आकर्षण आहे ते म्हणजे या सोहळ्याच्या निमित्ताने रश्मिका उपस्थित राहणार आहे. ती केवळ उपस्थितच नाही राहणार तर या सोहळ्यात ती धमाकेदार सादरीकरण देखील करणार आहे.
आतापर्यंत रश्मिकाच्या प्रत्येक अदा चाहत्यांना घायाळ करणाऱ्या होत्या. आता या सोहळ्यामध्ये ती लावणीवर ठेका धरताना दिसणार असून ती पुन्हा एकदा चाहत्यांना घायाळ करणार हे नक्की. तिने ही लावणी फक्त वन टेकमध्ये केली आहे. यामुळे हा सोहळा पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. तसेच यादरम्यान ती मराठीमध्ये संवाद साधताना देखील दिसणार आहे.
झी गौरव पुरस्कार सोहळा हा येत्या रविवारी म्हणजेच २६ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता पाहता येणार आहे. या पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.