५ सप्टेंबर हा दिवस भारतात ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. तर आज शिक्षकदिनानिमित्त जाणून घेऊया काही बॉलिवूड कलाकार जे आता जरी उत्तम कलाकार असले तरी त्यांनी या क्षेत्रात येण्याआधी शिक्षक म्हणून अनुभव घेतला आहे.
बॉलिवूडचे असे काही कलाकार आहेत जे सिनेमातच नाही तर खऱ्याआयुष्यातही ज्यांनी शिक्षकाची भूमिका अगदी उत्तमरीत्या पार पडली आहे. हे कलाकार सिनेसृष्टीत येण्याआधी त्यांनी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम केले आहे. काही डॉक्टर, इंजिनीअर देखील आहेत. ज्यांनी शिक्षक म्हणून काम केले आहे व त्यांचे चित्रपट देखील प्रेक्षक मोठ्या आवडीने पाहतात.
अक्षय कुमार :-
बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणार अक्षय कुमार याने बँकॉकमध्ये असताना मुलांना मार्शल आर्टचे धडे दिले. तसेच मुंबईत आल्यानंतर त्याने मुंबईत मार्शल आर्टचे स्कूल देखील सुरू केले.
सान्या मल्होत्रा :-
सान्या मल्होत्रा हिला लहानपणापासूनच नृत्याची फारच आवड होती. ती एक बॅले कंपनीत डान्सची शिक्षिका देखील होती.
अनुपम खेर :-
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांनी २००५ मध्ये ‘Actor Prepares’ ड्रामा स्कूल देखील ओपन केली आहे. त्यांच्या स्कूलमध्ये बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट कलाकारांनी अभिनयाचे धडे घेतले आहेत. यात कियारा आडवाणी, अभिषेक बच्चन, दीपिका पदुकोण, वरुण धवण यांसारख्या अनेक सुप्रसिद्ध कलाकारांचा समावेश आहे
नंदिता दास :-
नंदिता दास यांनी हृषी व्हॅली नावाची एक स्कूल चालू केली आहे. त्यात त्या स्वतः एक शिक्षिका म्हणून काम केले आहे.
कादर खान :-
अभिनेते कदर खान हे हिंदी सिनेसृष्टीतील कॉमेडी किंग म्हणून ओळखले जायचे. अभिनयात येण्यापुर्वी ते हरियाणातील एका शाळेत क्रिकेटचे कोच होते. त्यांनी १९७०-७५ च्या काळात महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले होते.