‘चला हवा येउ द्या’ या कॉमेडी शो मधील सर्वांचा लाडका अभिनेता म्हणजेच डॉ.निलेश साबळे हा शो आठवला की, सर्वांच्या डोळ्यासमोर पहिल्यांदा डॉ.निलेश साबळे यांचा चेहरा येतो. या शोच्या माध्यमातून त्यांनी फक्त महाराष्ट्रातच न्हवे तर जगभरामध्ये नाव कमावल आहे. डॉ. असलेला हा अभिनेता मनोरंजन विश्वातील एक प्रसिद्ध चेहरा बनला आहे. त्याने ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या शोमधून कलाविश्वात पदार्पण केलं असून त्याचा हा प्रवास ‘चला हवा येऊ द्या’ या शो वर येऊन पोहचला आहे.
कलाविश्वामध्ये येण्याआधी निलेश एक डॉक्टर देखील आहे. त्याने खूप शिकून व मेहनत करून डॉक्टर की ची पदवी मिळवली. त्यानंतर त्याने वाशीच्या एमजीएमन्यू बॉम्बे या हॉस्पिटल मध्ये सहा महिने नोकरी देखील केली. आपला मुलगा डॉक्टर झाला हे ऐकून त्याच्या आई-वडीलांना देखील त्याच्यावर अभिमान होता. पण निलेशला मात्र लहान पणापासूनच अभिनय क्षेत्राची खूप आवड होती. तो शाळेत शिकत असताना देखील अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमात नेहमीच सहभागी होत असे.
View this post on Instagram
डॉक्टर झाला असला तरी देखील अभिनयाचं वेड त्यांना शांत बसू देत नव्हत त्याच दरम्यान त्यांना ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या शो बद्दल माहिती मिळाली. व त्याने आई-वडिलांची परवानगी घेतली त्याच्या या निर्णयाला पालकांनी होकार दिला पण त्याच्या समोर एक अट देखील ठेवली होती. आई-वडील निलेशला म्हणाले की, ‘तू जा पण, जर दोन वर्षात या क्षेत्रात काही करू शकला नाहीस, तर पुन्हा डॉक्टरकीकडे वळायचं. तो या शोमध्ये सहभागी झाला व विजेतेपद पटकावले यानंतर तो अभिनय क्षेत्रात घोडदौड करू लागला व यशस्वी देखील झाला. त्याने ‘फु बाई फु’ यांसारख्या बऱ्याच कार्यक्रमात सूत्रसंचालनाचे काम केले त्याचा हा सुरु झालेला प्रवास आत्ता अभिनेता, लेखक, दिग्दर्शक व निर्मात्यावर येऊन पोहचला आहे.