मणिपूरमधील इंफाळ येथे Bridal Couture Festive Season Fall Winter Collection 2023 या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. हा शो रविवारी पार पडणार होता.
या फॅशन शोची बरीच चर्चा झाली, त्याचे कारण म्हणजे या शोला बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सनी लिओनी हजेरी लावणार होती. परंतू या शो पूर्वीच म्हणजेच शनिवारी सकाळी तेथील परिसरात स्फोट झाला.
मणिपूरची राजधानी इंफाळ येथील हट्टा कांगजेबुंग भागात ही घटना घडली आहे. फॅशन शोच्या ठिकाणापासून जवळपास १०० मीटर अंतरावर हा स्फोट झाला आहे. सुदैवाने या स्फोटामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. इंफाळ पूर्व एसपी महाराबम प्रदीप सिंह यांनी एएनआयला माहिती दिली की, शनिवारी सकाळी ६ वाजता हा झालेला हा स्फोट चिनी ग्रेनेडमुळे हा स्फोट झाला असावा असा अंदाज लावला जात आहे.
सनी लिओनी या शोसाठी रविवारी मणिपूरमधील इंफाळ येथे उपस्थित राहणार होती. तसेच या शो दरम्यान ती हँडलूमला प्रमोट करणार होती. तिच्यामुळे हा शो आधीच चर्चेत आला होता आणि तिच्या मोठ्या चाहत्यावर्गामुळे या शोची बरीच तिकीटेही विकली गेली होती.
चार ते पाच दिवसांपूर्वी शूटींग दरम्यान सनीचा अपघात झाला होता, तेव्हा तिच्या पायाला दुखापत झाली होती. तर आता तिच्या भोवती घोंघावणारं संकट तिच्या पुढ्यात येण्यापूर्वीचं टळलं आहे.