मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या मालिकांमध्ये टीआरपीच्या शर्यतीत उच्चांक गाठण्यासाठी चांगलीच चढाओढ सुरु आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये सर्वाधिक वेळा टीआरपीमध्ये अव्वल स्थान पटकावत ‘ठरलं तर मग’ (Tharal Tar Mag) ही मालिका गेल्या वर्षीची सर्वाधिक लोकप्रिय मालिका ठरली.
तर यंदा, २०२४ मध्ये मराठी मालिकांच्या टीआरपीच्या यादीत कोणता चढ-उतार असणार हे जाणून घेण्यासाठी सर्वच उत्सुक होते. ठरलं तर मग या मालिकेने गेल्या वर्षी बाजी मारल्यामुळे बाकी मालिका सुद्धा कंबर कसून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जुई गडकरीच्या या मालिकेने प्रेक्षकांना काहीचं दिवसांत भुरळ घातली. त्यामुळे या मालिकेचा दबदबा कमी कसा करायचा आणि टीआरपीमध्ये कसं उच्च स्थान मिळवायचं हेच साऱ्या वाहिन्या ठरवत आहे. याचमुळे काही दिवसांतच काही नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या.
नव्या मालिकांनी देखील प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. त्यामुळे आता पुन्हा एकदा साऱ्यांचे लक्ष लागले ते टीआरपीच्या यादीकडे. नुकतीच एप्रिल महिन्यातील म्हणजेच १६ व्या आठवड्यातील टीआरपीची यादी नुकतीच जाहीर झाली. यावरून जरी नव्या मालिका नुकत्याच प्रेक्षकांच्या भेटीला आल्या असल्या तरी जुन्या मालिकांचं टीआरपीच्या यादीवरील वर्चस्व आजही तसंच आहे. या आठवड्याच्या टीआरपीच्या यादीत ठरलं तर मग या मालिकेने नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा बाजी मारली आहे. या मालिकेला १६ व्या आठवड्यात ६.७ इतके रेटिंग आहे. त्यामुळे ही मालिका फक्त छोट्या पडद्यावरच नाही तर प्रेक्षकांच्या मनावर देखील राज्य करत आहे.
टीआरपीच्या शर्यतीत पहिला क्रमांक ठरलं तर मग या मालिकेने पटकावला असला तरी बाकी टॉप पाच मालिका कोणत्या ते चला पाहूया.