आपल्या खऱ्या स्वभावाने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलेला कलाकार म्हणजे शिव ठाकरे. शिव ठाकरे नाव ऐकल की आपसूकच नाजरे समोर येतो, बिग बॉस हा रिऍलिटी शो. मराठमोळा अभिनेता शिवने बिग बॉस मराठी सिझन ३च्या ट्रॉफीवर त्याचं नाव कोरल होतं.
तर त्यांनतर काहीच दिवसांत तो हिंदी बिग बॉसच्या घरात दिसला. आतापर्यंत शिवने हिंदी बिग बॉसचा १६वा सिझन दणदणीत गाजवला. तो सध्या सिझन १६च्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये असून तो पुन्हा एकदा बिग बॉसच्या ट्रॉफीचा मान पटकावेल की नाही ते महाअंतिम सोहळ्यातचं समजेल.
बिग बॉस १६चा महाअंतिम सोहळा उद्याच म्हणजे १२ फेब्रुवारीला पार पडणार आहे. त्यामुळे हिंदी बिग बॉसच्या यंदाच्या सिझनच्या ट्रॉफीचा दावेदार कोण हे येत्या काही तासांतच कळणार आहे. परंतू ग्रँड फिनालेपूर्वीच शिव ठाकरेचं नशीब चमकल आहे. कारण प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी शिवला एक खास ऑफर दिली आहे.
काही वर्षांत शिवने केलेली कामगिरी ही वाखाणण्याजोगे आहे. त्याच्या या कर्तृत्वामुळे बॉलिवूडचा दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी १६व्या सिझनच्या महाअंतिम सोहळ्याआधीच बिग बॉसच्या घरात जाऊनच शिवला थेट ऑफर दिली आहे. सोहळ्याआधी रोहित शेट्टी बिग बॉसच्या घरात सर्व स्पर्धकांसोबत जबरदस्त टास्क खेळताना दिसणार आहे.
या टास्क दरम्यान रोहित शेट्टी शोचा एक भाग म्हणून नाही तर त्यांच्या ‘खतरों के खिलाडी’च्या १३व्या सिझनसाठी स्पर्धकांची निवड करण्यासाठी येत आहे. रोहित शेट्टीने अर्चना गौतम, प्रियांका चौधरी चहर, शालीन भानोत आणि शिव ठाकरे यांना काही अवघड टास्क देताना दिसत आहे.
त्यानंतर त्यांनी एक जबरदस्त घोषणा केली की, तुमच्यापैकी एका स्पर्धकाला खतरों के खिलाडीमध्ये जाण्याची संधी मिळणार आहे. तर यासाठी शिव ठाकरे आणि अर्चना गौतमचही नाव चर्चेत आहे. तर यातून खतरों के खिलाडी १३व्या सिझनच्या पहिल्या स्पर्धकाच नाव महाअंतिम सोहळ्यामध्ये समजणार आहे.