सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद खान यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती सलमान खान फिल्म्स आणि झी स्टुडिओज यांनी केली आहे. या चित्रपटाची सोमवारपासून बूकिंग सुरू झाली असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजणार असं दिसतय.
View this post on Instagram
तसेच सलमान खान नेहमीच त्याच्या खासगी किंवा त्याच्या चित्रपटांमुळे सोशल मिडियावर चर्चेत असतो. त्याचा चाहते नेहमीच त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान खान पहिल्यांदाच पूजा हेगडे सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. यांच्याशिवाय शहनाज गिल, पलक तिवारी, राघव जुयल, सिद्धार्थ निगमसह अनेक दिग्गज कलाकार आहेत.
View this post on Instagram
या चित्रपटाची पहिल्याच दिवशी अॅडव्हास बुकिंग फुल झाली आहे. अॅक्शन आणि कॉमेडी असलेला हा चित्रपट 21 एप्रिलला थिएटरमध्ये दाखल होणार असून त्याच्या प्रदर्शनासाठी अवघे तीन दिवस बाकी आहेत. सलमानचा हा चित्रपट ईदच्या शुभमुहूर्तावर रिलीज होणार असून त्याच्या पहिल्या दिवसाच्या अॅडव्हास बुकिंगचे आकडे हे आश्चर्यकारक आहेत. या चित्रपटाच्या गाण्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सलमानच्या या चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या बूकिंग मध्येच एक कोटी इतकी रक्कम कमावली आहे. चित्रपटासाठी लिमिटेड थिएटरमध्ये बूकिंग सुरू असून आत्ता पर्यंत ५० हजार तिकीटांची विक्री झाल्याचे समजते. मुंबईतील मल्टिप्लेक्स आणि सिंगल थिएटरमध्ये वीकेंडला 150 ते 600 रुपयांना तिकीट विकले जात आहे. तर दिल्लीत तिकिटाचे दर 250 ते 1200 रुपयांपर्यंत आहेत. असं बोललं जात आहे.