अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि अभिनेता यशोमान आपटे यांची फुलपाखरू मालिकेतील वैदेही आणि मानस ही जोडी प्रचंड गाजली. कॉलेजपासून सुरु झालेली एक सुंदर लव्ह स्टोरी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच भावली. त्यामुळे ही मालिका कधी संपूच नये असे सर्वांनाच वाटायचे. त्यामुळे मालिकेच्या चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. ती बातमी म्हणजे लवकरच फुलपाखरू या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.