‘शार्क टँक इंडिया’ मधील सगळ्यांचा आवडता शार्क म्हणजे अशनीर ग्रोव्हर.
‘शार्क टँक इंडिया’च्या पहिल्या सिझनमध्ये अशनीर ग्रोव्हर हा शार्कच्या भूमिकेत होता. प्रेक्षकांना देखील तो प्रचंड आवडत होता. ‘शार्क टँक इंडिया’च्या दुसऱ्या सिझनमध्ये अशनीर नसल्यामुळे प्रेक्षक अतिशय नाराज झाले होते. पण आता पुन्हा एकदा अशनीर ग्रोव्हर छोट्या पडद्यावर पुरागमन करत आहे.
पण या वेळी तो ‘शार्क टँक इंडिया’मधून नाही तर ‘रोडीज’ या रिअॅलिटी शो मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रोडीज’ हा एक गेम शो आहे, तसेच या शोकडे एक वादग्रस्त शो म्हणून देखील पाहिले जाते. हा शो तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. या शोचे ऑडीशन सुरु झाले असून, या मध्ये गँग लीडरच्या भूमिकेत प्रिन्स नरूला, रिया चक्रवर्ती, गौतम गुलाटी आणि सोनू सूद हे दिसणार आहेत. पण त्याच बरोबर यात आणखी एका व्यक्तीची एन्ट्री झाली आहे तो म्हणजे अशनीर ग्रोव्हर याची.
हे देखील वाचा : मधुराणीची आपल्या मुलीसाठी खास पोस्ट…
नुकताच MTVच्या सोशल मिडियावरून या शोचा प्रोमो आला आहे. या प्रोमोमध्ये प्रिन्स नरूला, रिया चक्रवर्ती, गौतम गुलाटी आणि सोनू सूद हे तर आहेतच. पण याच बरोबर अशनीरला पाहून सगळ्यांना धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये अशनीर एका स्पर्धकाला “तू भीख ही मांग रहा है भाई ले लो मेरे को” असं म्हणताना दिसतोय.
View this post on Instagram
त्यामुळे अनेक जण अशनीरवर टीका करत आहेत. या व्हिडीओ खाली चाहत्यांनी कमेंट करत लिहिले आहे, की “ “अशनीर कोणत्या लाईनमध्ये आलास तू?” तर दुसऱ्या एका युजरने “भाई तू हे काय करतोस?” असे प्रश्न त्याला विचारले आहेत.