शाहरुख खान हा बॉलिवूड मधील सुपरस्टार अभिनेता आहे तर गौरी खान ही एक चित्रपट निर्माती व डिझायनर आहे. बॉलिवूडमध्ये त्यांची जोडी आदर्श जोडी म्हणून ओळखली जाते. शाहरुख हा त्याच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतो त्याचा चाहता वर्ग देखील प्रचंड मोठा आहे. गौरीने देखील अनेक सेलिब्रिटीच्या घरापासून ते त्यांच्या ऑफिस पर्यंतच डिझायन तिने केल आहे. ते नेहमीच एकमेकांना पती पत्नी म्हणून चांगली साथ देतात. शाहरुखच्या कठीण काळात गौरी नेहमीच त्याला मदत करत असते.
शाहरुखने काही वर्षांपूर्वी फराह खानच्या ‘तेरे मेरे बीच में’ या टॉक शोमध्ये गौरी मला कधीच गिफ्ट देत नाही अस सांगितल होत. सध्या त्यांचा हा जुना व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. फराह खान ही शाहरुखची चांगली मैत्रीण असून ती बॉलिवूड मधील एक प्रसिद्ध दिग्दर्शक देखील आहे. जेव्हा गौरीला विचारण्यात आले की, ती शाहरुख खानला कधीच गिफ्ट देत नाही यावर तिने असं सांगितल की, “ज्या माणसाकडे सर्व काही आहे त्याला मी काय देणार?”
शाहरुखने गौरीचा एक जुना किस्सा देखील सांगितला आहे. तो म्हणाला की,“माझे ऑपरेशन झाल्याने आम्ही काही दिवस लंडनमध्ये राहत होतो. त्यावेळी लंडनमध्ये मी एक नवे टी-शर्ट घेतले होते पण ते मला व्यवस्थित झाले नाही म्हणून मी गौरीला टी-शर्ट बदलून आण असे सांगितले. यानंतर गौरीने मला सांगितले मी दुकानात गेले, परंतु त्यांनी मला तुझा टी-शर्ट बदलून दिला नाही.”
याबद्दल शाहरुखने असं सांगितल की, “काही दिवसांनीकाजोल आणि पॅमेला या आमच्या मैत्रिणी घरी आल्या होत्या…तेव्हा त्यांनी मला सांगितले, “गौरी खरंच टी-शर्ट बदलायला गेली होती परंतु तिने दुसरे टी-शर्ट न घेता दुसरे काहीतरी घेतले.” याबद्दल मी गौरीला विचारले तेव्हा तिने सांगितले, “तुझे ऑपरेशन झाले आहे तुला नव्या कपड्यांची काय गरज आहे? म्हणून मी मला हॅंडबॅग घेतली.”