प्रसाद जवादे याने अनेक मराठी व हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच मराठी चित्रपटांमध्ये देखील त्याने आपल्या भूमिका गाजवल्या आहेत. तो बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिझनमध्ये देखील झळकला होता. बिग बॉस मधून त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून तो घराघरात पोहचला.
प्रसादचं अग्निपंख हे नाटक सुद्धा खूप गाजलं होत. तसेच त्याने छिछोरे या चित्रपटात देखील छोटी भूमिका केली होती. त्याची हिंदी मालिकेमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका सुद्धा चांगलीचं गाजली होती. बिग बॉस मध्ये देखील त्याने शेवट पर्यंत उत्तम प्रकारे खेळून प्रेक्षकांचं मन जिंकलं.
बिग बॉस नंतर त्याला एक नवीन मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. लवकरच तो एका नव्या मालिकेत दिसणार आहे. ही मालिका कलर्स मराठीवर सुरु होणार असून त्या मालिकेचे नाव ‘काव्यांजली – सखी सावली’ असं आहे. तो या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही मालिका दोन बहिणींच्या नात्यावर आधारित असून या मालिकेमध्ये प्रसाद प्रीतम ही भूमिका साकारणार आहे.
त्याची प्रीतम ही भूमिका एका रेडीओ जॉकीची आहे. लवकरचं या मालिकेत प्रसाद जवादे ची एन्ट्री होणार असून त्याची ही मालिका पाहण्यासाठी त्याचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत. त्याच्या या मालिकेचा प्रोमो समोर आला असून त्याला “आपला होस्ट आणि दोस्त प्रीतम येतोय आपल्या भेटीला… तुम्ही तयार आहात” अशी लाईन दिली आहे.
हे देखील वाचा : अखेर ऋतुराजच्या गर्लफ्रेंडचा चेहरा आला समोर….