क्रिकेटर आणि अभिनेत्री यांची नाव नेहमीच एकमेकांसोबत जोडली जातात. तसेच आतापर्यंत अनेक क्रिकेटपटूच्या लाईफ पार्टनर या अभिनेत्री आहेत. अशातच मागील काही वर्षापासून एका अभिनेत्रीचं नाव नेहमीच ऋतुराज गायकवाड सोबत जोडलं जात होत.
मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव हीच नाव आतापर्यंत अनेकवेळा ऋतुराजसोबत जोडण्यात आलं आहे. गेल्या २ ते ३ वर्षापासून या दोघांच्या अफेरच्या चर्चा सुरु आहेत. यावर आतापर्यंत ऋतुराजने कधीच भाष्य केल नाही. पण सायली अनेकवेळा याबद्दल बोलताना दिसून आली होती. सायलीने अनेकवेळा या फक्त अफवा असल्याच स्पष्ट केले आहे. ती एका मुलाखतीमध्ये म्हणाली होती की, “ आम्ही दोघे फक्त चांगले मित्र आहोत त्यापलीकडे असे काहीच नाही.
हे देखील वाचा : मृण्मयी देशपांडेच्या गाजलेल्या भूमिका…..
परंतु चाहते नेहमी तिच्या फोटो खाली ऋतुराजबद्दल कमेंट करत असतात.
पण आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काल IPL २०२३ चा शेवटचा सामना खेळवण्यात आला. यामध्ये ‘चेन्नई सुपर किंग्स’ने बाजी मारली आणि IPL २०२३ च्या विजेतेपदाचा मान पटकावला.
View this post on Instagram
अशातच ऋतुराजने आपल्या सोशल मिडियावरून त्याच्या होणाऱ्या बायकोचा फोटो शेअर केला आहे. तीच नाव उत्कर्षा आहे. ती देखील क्रिकेट खेळते असं म्हंटल जातं. गेल्या वर्षी ऋतुराज आणि उत्कर्षा एकत्र जिममध्ये दिसले होते. पण त्यानंतर कधीच ते एकत्र दिसले नाहीत. त्यामुळे त्या चर्चांना तिथेच पूर्णविराम मिळाला होता. पण आता ऋतुराजने दोघांचा फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. त्याच्या या फोटोवर सायलीने देखील कमेंट केली आहे, “ अभिनंदन उत्कर्षा आणि ऋतुराज”.
View this post on Instagram
चाहते देखील प्रचंड खुश आहेत. आता ऋतुराज कधी बोहल्यावर चढणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.