मराठी सिनेसृष्टीतील आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री ‘अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade)’ हिने आपल्या अभिनयाने कायमच प्रेक्षकांची मनं जिंकली. तसेच तिच्या खासकरून ऐतिहासिक आणि कौटुंबिक भूमिकांनी प्रेक्षकांना भुरळ घातली. त्यामुळे तिचा भलामोठा चाहतावर्ग देखील आहे.
अश्विनी नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत तिचे चांगले-वाईट सारेच क्षण शेअर करत असते. त्यामुळे ती आणखीनच चाहत्यांना जवळची वाटते. काही वर्षांपूर्वी तिने साकारलेली छत्रपती संभाजी महाराज यांच्या बहिणीची म्हणजेच ‘राणुआक्का’ ही भूमिका इतकी गाजली की, आजही त्यांची आठवण आली की डोळ्यांसमोर उभा राहणारा चेहरा म्हणजे अभिनेत्री अश्विनीचा. तसेच सध्या अश्विनी आई कुठे काय करते या मालिकेतील अनघा हे पात्र साकारत आहे. तिच्या या भूमिकेचं देखील प्रचंड कौतुक होत असतं. एकूण काय तर अश्विनी ही मालिका विश्वातील सध्याची लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री आहे.
View this post on Instagram
अभिनयासोबतच ती तिच्या सोशल मीडियावर देखील कायम सक्रीय असते. ती तिच्या संबंधित अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते. अन् त्यावर तिचे चाहते देखील तिला उत्तम प्रतिसाद देत असतात. नुकताच अश्विनीने एक व्हिडीओ तिच्या इंस्टाग्रामवरून शेअर केला. या व्हिडीओमधून तिने तिचं स्वप्नपुर्तीची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. तर ही आनंदाची बातमी म्हणजे अश्विनीने नुकतंच घर घेतलंय, त्यामुळे सध्या ती प्रचंड खुश आहे. काही दिवसांपूर्वीच तिने या स्वप्नपुर्तीची बातमी सांगितली होती. तेव्हा पोस्ट शेअर करत ती म्हणाली होती की, “प्रचंड स्वप्नं पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करा.मग काय…… स्वप्नं पूर्ण होतातच. आज एक स्वप्न पूर्ण झालं.”
तर आता या व्हिडीओमध्ये ती एकटी नसून तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंड नील जगदाळे देखील आहे. ते दोघेही आलिशान बिल्डिंगमधील २१ व्या मजल्यावरील घरात जाऊन त्यांनी घराची एक झलक दाखवली आहे. अश्विनीने पोस्ट करत घराचं स्वप्न पूर्ण झालं असल्याचे सांगितले. तेव्हा तिने पोस्टमध्ये लिहिले की, “आम्ही हे एकत्र केलंय, आपल्या कामात राम शोधला की स्वप्नं पूर्ण होतातच. अर्थात स्वप्नं एकाचं असलं तरी त्या साठी बळ देणारे हात फार महत्त्वाचे असतात.
या स्वप्नासाठी आम्हाला कोणत्या न कोणत्या कारणाने मदत करणाऱ्या सगळ्यांचेच आम्ही ऋणी आहोत. पहिल्या पायरीपासून ते २१ मजले हा प्रवास तसा काही मिनिटांचा आहे पण आम्हाला खूप वेळ लागला. चांगले – वाईट, सुख – दुःख असे सगळेच सोबत घेवून पुढे आलो आणि हे एक स्वप्न पूर्ण करू शकलो.”
अश्विनीच्या या पोस्टवर तिचे चाहते आणि कलाकार मंडळी भरभरून कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत.