हा मॅगझीन फोटो पाहून बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती
१९९० मध्ये मॅगझीनमध्ये एका मुलीचा फोटो छापून आला होता. त्यावर लिहिले होते की, मी श्रीदेवीची अनोळखी बहिण आहे. तिचं नाव देखील मॅगझीनवर छापण्यात आलं होतं. त्या मॅगझीनच्या सगळ्या कॉपी फक्त श्रीदेवीच्या बहिणीला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात विकल्या गेल्या. त्या फोटो मधील मुलीचा चेहरा देखील श्रीदेवीच्या चेहऱ्याशी मिळता जुळता होता. तिचे नाव ‘प्रभादेवी’ असे होते. श्रीदेवीची बहिण कशी दिसते हे कोणालाही माहिती नव्हतं, तिला पाहण्यासाठी सर्वच उत्सुक होते. हा मॅगझीन फोटो पाहून बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती.
1 एप्रिलला हे मॅगझीन बाजारात आले होते. पण त्यामागचं सत्य समजताच सर्वांमध्ये हास्य फुटला. त्या मॅगझीन वरची मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेता अनुपम खेर होते. त्यांनी मॅगझीन सोबत मिळुन केलेला हा एक प्रँक होता. बॉलिवूडला एप्रिल फुल करण्यासाठी मॅगझीनबरोबर टायअप करून हा प्रँक केला होता. अनुपम खेर श्रीदेवी सारखं दिसण्यासाठी मेकअप आर्टिस्ट आणि स्टायलिस्ट मिक्की कॉन्ट्रॅक्टरनं खूप मेहनत घेतली. एप्रिल फुल करण्यासाठी आखलेला हा त्यांचा प्लान सक्सेस झाला होता. पहिले तर याबद्दल कोणालाही खर वाटत नव्हते, पण त्या फोटोतील मुलगी म्हणजे स्वतः अनुपम खेर होते.
View this post on Instagram
श्रीदेवीच्या गेटअप मधील अनुपम खैर याचं फोटोशूट गौतम राजाध्यक्ष यांनी केले होते. एखाद्या ग्लॅमरस अभिनेत्री प्रमाणे त्यांनी पोस दिल्या होत्या. ३२ वर्षांनी या जुन्या आठवणींना उजाळा देत अनुपम खेर यांच्या एका फोटो ने रात्री सर्वाना कसं खडबडून जागं केलं होतं, हे देखील सांगितले. त्यांनी १९९१ मधला जुना फोटो आपल्या सोशल मिडीयावर शेअर केला होता.
अनुपम खेर यांनी लिहिलं, “सिनेब्लिट्स मॅगझीनच्या कव्हर पेजवर असलेली मुलगी मी आहे. 1991चा हा एप्रिल फुल इशू होता. या फोटो ने बॉलिवूडमध्ये खळबळ माजवली होती. मिकी कॉन्ट्रॅक्टरने माझा मेकअप केला होता आणि फोटोग्राफर गौतम राजाध्यक्षनं माझा फोटो काढला होता. ते सोनेरी दिवस होते”.
हे देखील वाचा : सिनेसृष्टीत येण्याआधी काय होत आकाश ठोसरचं स्वप्न?