टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १७’व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला असून अखेर चार महिन्यांनी २८ जानेवारीला या शोचा विजेता घोषित करण्यात आला. यावेळी टॉप ५ स्पर्धकांमध्ये मनारा चोप्रा, अभिषेक कुमार, मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे व अरुण या स्पर्धकांनी धडक मारली होती. अखेर अटीतटीच्या लढाईत प्रेक्षकांची सर्वाधिक मतं मिळवत शेवटी मुनव्वर फारुकीने विजेत्या पदावर नाव कोरलं आहे.
मुनव्वर हा मूळचा गुजरातचा असून त्याचं बालपण हे अगदी हालाखीच्या परिस्थितीत गेले. वडिलांच्या कर्जामुळे त्याला शिक्षण सोडून काम करावं लागलं. त्याची आई आणि आजी उत्तम समोसे बनवायच्या व मुनव्वर स्वतः स्टॉल लावून ते विकत असे. मुंबईत आल्यावरही मुनव्वरने एका गिफ्ट शॉपमध्ये, तसेच एका भाड्यांच्या दुकानात अगदी पडेल ते काम केलं. ‘लॉक अप’ या शोदरम्यान मुनव्वरने आपल्या आईबद्दल एक मोठा खुलासा केला होता. त्याच्या आईने आत्महत्या केली होती. याविषयी बोलताना मुनव्वर म्हणाला, “माझी आई घर चालवण्यासाठी जे जमेल ते काम करायची, परंतू आमच्या घरात तिचा मान कुणीच ठेवला नाही. माझ्या बहिणीच्या लग्नासाठीसुद्धा माझं कुटुंब माझ्या आईलाच दोष देतं. माझ्या वडिलांवरही प्रचंड कर्ज होतं. अशी बरीच कारणं होती ज्यामुळे माझ्या आईने आत्महत्येसारखा मोठा निर्णय घेतला. माझी आई खूप खंबीर होती, तिला नेमकं काय होत आहे हे मी तिला विचारू शकलो नाही याची खंत मला आजही आहे.”
Also Read: Munawar Faruqui Wins Bigg Boss 17: A Rollercoaster Journey to Victory
तसेच मुनव्वरने बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यापासून त्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. परंतू मुनव्वरला त्याच्या चाहत्यांकडून सगळ्यात मोठा पाठिंबा मिळाला. अखेर अंतिम लढाईत प्रेक्षकांकडून मिळालेल्या सर्वाधिक मतानुसार मुनव्वर विजयी ठरला आहे. याआधी देखील त्याने कंगणाच्या ‘लॉकअप’ या रिअॅलिटी शोमध्ये बाजी मारली होती. त्यामुळेच या शोच्या पहिल्या दिवसापासून मुनव्वर बिग बॉसच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता.
View this post on Instagram
मुनव्वर या शोचा विजेता असून शोचा उपविजेता अभिषेक कुमार ठरला आहे. बिग बॉस १७ ची ट्रॉफी जिंकल्यानंतर मुनव्वरला ५० लाख रुपये आणि आलिशान कार भेट म्हणून मिळाली आहे. सध्या चाहत्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शो जिंकल्यानंतर मुनव्वरने ट्रॉफीबरोबरचा फोटो शेअर करत पोस्ट केली आहे. कॅप्शनमध्ये लिहिले की, “जनता, तुम्हाला खुप खुप धन्यवाद! तुमच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे बिग बॉसची ट्रॉफी डोंगरीत आणली आहे. संपूर्ण सीझनमध्ये योग्य मार्गदर्शन दिलेल्या सलमान खानचे विशेष आभार. संपूर्ण #munawarkijanta आणि #munawarkewarrior या सर्वांचे मनापासून धन्यवाद.”
मुनव्वर फारुकीच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स व लाइक्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी त्याच्या या पोस्टवर कमेंट करून ट्रॉफी जिंकल्याबद्दल त्याचं अभिनंदन केलं आहे.
Also Read: यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाने आणि कलाकारांनी मारली बाजी, पाहा संपूर्ण यादी…