अभिनेता आकाश ठोसर: सैराट ते घर, बंदुक, बिर्याणीचा प्रवास
सैराट या चित्रपटातून घराघरात पोहचलेला अभिनेता म्हणजेचं आकाश ठोसर. २०१६ ला प्रदर्शित झालेल्या सैराट चित्रपटातून त्याने मनोरंजन सृष्टीत पदार्पण केले. त्याचा पहिलाच चित्रपट सुपरहिट झाल्याने तो प्रसिद्धीच्या झोतात आला. त्या चित्रपटातील त्याची परश्याची भूमीका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. अजूनही त्याचे चाहते त्याला परश्या या नावानेच ओळखतात. परंतु त्याला सिनेसृष्टीत काम न करता पोलीस व्हायचे होते. आकाशने लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये याचा खुलासा केला आहे.
मराठी चित्रपट “घर, बंदूक, बिर्याणी”: आगामी रिलीजची एक झलक
लवकरच तो एका नवीन भूमिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्या आगामी येणाऱ्या घर, बंदूक, बिर्याणी या चित्रपटामुळे तो सध्या चर्चेत आहे. ‘घर बंदूक बिर्याणी’ चित्रपटाच्या टीमने लोकसत्ता डिजिटल अड्डाला हजेरी लावली. यावेळी सेटवरील किस्से, गमतीजमती याबरोबरच आकाशने वैयक्तिक आयुष्यबाबतही भाष्य केलं.
हे देखील वाचा: अभिनेता आकाश ठोसर अडकणार लग्नबंधनात.
आकाश म्हणाला, “मला हे सगळं अजूनही स्वप्नवत वाटत आहे. मोठं होऊन मी अभिनेता होईन किंवा टीव्हीवर दिसेन, असं मला कधीच वाटलं नाही. माझी स्वप्नही अगदी छोटी होती. मोठं होऊन पोलीस अधिकारी व्हायचं, आई-वडिलांसाठी घर घ्यायचं, असं मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाला वाटतं. मलाही तसंच वाटत होतं.”
क्लासरूम ते स्टारडम: अभिनेता आकाश ठोसरचा प्रवास आणि सैराटचा त्याच्या आयुष्यावरील प्रभाव
“दहावीनंतर मी तालमीत गेलो. तिथे मला नागराज मंजुळे सरांच्या भावाने पाहिलं. त्यानंतर त्यांनी मला चित्रपटात घेतलं. माझं सैराटच्या आधीचं आणि नंतरचं आयुष्य फार वेगळं आहे. भविष्यात असं काही होईल, याचा मी विचारही केला नव्हता. सैराट आधी मी दोनदा पोलीस भरतीसाठी गेलो होतो. पोलीस व्हायचं हे माझं स्वप्न होतं. पण सैराटनंतर माझं आयुष्यच बदललं,” असंही पुढे आकाश म्हणाला.
“दिग्दर्शक हेमंत अवताडे यांचा ‘घर, बंदुक, बिर्याणी’ 8 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे”
घर, बंदूक, बिर्याणी हा चित्रपट ८ एप्रिलला प्रदर्शित होणार असून त्याचे दिग्ग्दर्शक हेमंत अवताडे हे आहेत. या चित्रपटामध्ये आकाश ठोसर सोबत सायली पाटील व सयाजी शिंदे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटामध्ये नागराज मंजुळे दबंग पोलीस ऑफिसरची भूमिका साकारताना दिसणार आहेत.
हे देखील वाचा: आकाश ठोसर’ला लग्नासाठी हवी अशी मुलगी